Wednesday, April 27, 2022
अखिल देवरूखे ब्राह्मण पतिनिधी परिषदेची छायाचित्रे
11.04.2022
श्री रमेश महाजन, माधवाश्रम, गिरगाव, मुंबई याना कोण ओळखत नाही? गेले 65 वर्ष या ना त्या कारणाने त्यांनी स्वतः आणि गेले 100 वर्ष त्यांच्या माधवाश्रम ह्या संस्थेने देवरूख्यांच्या वेगवेगळ्या संस्थांना लागेल ते सहाय्य जमेल त्या पद्धतीने केले आहे. त्यांच्या या औदार्या बद्दल अनेक लेख सुद्धा पूर्वी प्रकाशित सुद्धा झाले आहेत. पण आजचा हा छोटासा लेख एका खास औदर्याबद्दल आहे.
देवरूख्यांच्या इतिहासात घडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याची छायाचित्रे त्यांना अचानक त्यांचे निवस्थानी सापडली आणि त्यांच्या उरात भावनांचा हलकल्लोळ उठला. दिनांक 22 ते 24 मे 1927 रोजी श्री महादेव बजाजी वीरकर, बीए, एल एल बी, वकील सुप्रीम कोर्ट, मूळ गाव महाड, मुंबई रहिवासी, यांच्या अध्यक्षतेखाली माधवाश्रम येथे झालेल्या अखिल देवरूखे ब्राह्मण पतिनिधी परिषदेची ांना अचानक सापडली. आणि त्यांनी फोनाफोनी सुरू केली. ही अस्सल दुर्मिळ छायाचित्रे कोठेतरी जपून ठेवली जावीत ही त्या मागची ईच्छा. त्यांचे परममित्र श्री रमेश निंबकर यांनी माझे नाव घेतले आणि मला सम्पर्क करण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की ह्या छायाचित्रांची जागा स्वतःची वास्तू असलेल्या कोणत्याही देवरूखे संस्थेच्या कार्यालयात असू शकते. काल ताबडतोब त्यांनी ती छायाचित्रे विद्यार्थी सहायक संस्थेच्या कार्यालयात काल जमा केली.
ती एकंदर 6 आहेत, त्यातील एकाचा फोटो जो माझ्याकडे आहे तो मी आपणास माहितीसाठी पाठवत आहे. अशीच काही देवरूखे विषयक पुस्तके श्री रमेश निंबकर, मुलुंड यांचे निवासस्थानी आहेत पण ती सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कोणत्यातरी संस्थेने घ्यायला हवी. कुठूनतरी सुरवात व्हायला पाहिजे. !!
फेसबुकवरील स्तंभलेखक, लंडनस्थित संकेत कुलकर्णी ( देवरूखे नव्हे) जेव्हा सावरकर, सुभाषचंद्र बोस, गांधीजी सारख्या विभूतींचे ब्रिटिश संग्रहालयातील जुने दस्तऐवज, फोटो पाठवतो त्यावेळी लोक त्याचे फेसबुकवर भरभरून कौतुक करतात पण ज्या ब्रिटिशांनी ते जपून ठेवले त्यांचा गुण आपण कधी घेणार?
माधव भोळे
त्य
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment