Wednesday, April 27, 2022
कै. तर्कतीर्थ रघुनाथ शास्त्री कोकजे, दर्शन अध्यापक, कैवल्य धाम, लोणावळा
कै. तर्कतीर्थ रघुनाथ शास्त्री कोकजे, दर्शन अध्यापक, कैवल्य धाम, लोणावळा.
देवरूखे ब्राह्मण समाजातील, हिंदू धर्माचा गाढा अभ्यास असलेले कै रघुनाथ शास्त्री कोकजे यांची माहिती पुढील पिढीला व्हावी या साठी श्री मनोहर जोशी डोंबिवली यांनी केलेल्या विनंती वरून मी ही माहिती देत आहे.
कै. रघुनाथ शास्त्री कोकजे लोणावळा हे संस्कृत, वेद आणि हिंदू धर्म ह्या विषयाचे गाढे अभ्यासक होते. लोणावळा येथील धर्मनिर्णय मंडळ या मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते.
वरील विषयावर त्यांनी धर्मस्वरूप निर्णय ( २७ नोव्हेंबर १९३३), नवं आचारधर्म, भारतीय तर्कशास्त्र प्रवेश ( ५ जून १९४३), उत्कर्षाचा राजमार्ग अशी विविध पुस्तके लिहिली आहेत.
हिंदू धर्माचे आचरण सर्व सामान्य माणसाला सुटसुटीत व्हावे म्हणून मूळ तथ्य न बदलता प्रचलीत चालीरीती आणि मंत्रांमध्ये सुधारणा करून नवीन चालीरीती आणि धार्मिक प्रक्रियाना प्रोत्साहित करण्यासाठी पुणे येथे ज्ञान प्रबोधिनी संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
हिंदू धर्मातील सुधारणांबद्दलचे त्यांचे आधुनिक विचार ऐकून महात्मा गांधीनि त्यांना नवजीवन या त्यांच्या हिंदी मासिकात या विषयावर लेख लिहिण्यास विनंती केली होती आणि त्यांचे 2/3 लेख प्रसिद्ध झाले.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment