Thursday, February 17, 2022
देवरूखे 2
कालच्या माझ्या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्धल धन्यवाद. त्यातील काहींच्या अर्धवट ज्ञानामुळे चुकीची माहीती पसरत होती त्यांना दिलेले हे उत्तर. त्यांचे म्हणणे होते की ही मंडळी कमी महत्वाची कामे करत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी थोडक्यात सांगतो:
देवरूखे हे ऋग्वेदी ब्राह्मण असून त्यातील अनेक लोक अतिउच्चशिक्षित होते. सध्याचे कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविज्ञापिठाचे ( भारतातील पाहिले संस्कृत विद्यापीठ) पाहिले कुलगुरु डॉ. पंकज चांदे हे देवरूखे आहेत. एके काळी भारतातील 640 विद्यापीठाच्या असोसिएशनचे ते अध्यक्ष होते आणि जागतिक विद्यापीठानच्या असोसिएशनच्या, असोसिएशनचे असलेल्या एका कॉन्फरन्स चे सुद्धा काही काळ अध्यक्ष होते. या मध्ये आय आय टी, आय आय एम सारखी विद्यापीठे सुद्धा होती. त्यांचा 24 पानांचा बायोडेटा फक्त एका पानाच्या सत्कार पत्रात कँसॉलिडेट करताना माझी त्रेधा तिरपीट उडाली होती.
कै. रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर हे इंग्रजी आणि संस्कृतचे कलकत्ता येथील प्राध्यापक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी होते आणि गीता रहस्यच्या मुद्रशोधन ( प्रूफ रिडींग) मंडळात त्यांनी काम केले असा उल्लेख त्याच ग्रंथात आहे.
पंडित रघुनाथ शास्त्री कोकजे हे ज्ञानप्रबोधिनी पुणेचे संस्थापक सदस्य होते हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथांवर लिखाण करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांच्या नवयुग या मासिकात पाचारण केले होते.
वीर वामनराव मुकादम, गोध्रा, गुजरात, हे वल्लभभाई पटेलांचे बारडोली सत्याग्रहातील उजवा हात होते. त्यांनी गुजराथी मधून लिहिलेले महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय नावाजलेले चरित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुनर्मुद्रित करण्यासाठी घेतले होते.
कै लक्षुमणराव भोळे हे 1945 ते 1985 पर्यंत मुंबई शेयर बाजारात असलेल्या 4 ते 5 मराठी लासनस शेयर ब्रोकर पैकी एक होते. ते स्वतः एम कॉम एल एल बी होते.
महात्मा फुले यांचे सहकारी कै वासुदेव बाबाजी नवरंगे हे लंडन स्थित देवरूखे व्यापारी असून फुल्यांच्या अनेक सामाजिक कार्यात त्यांनी भरघोस आर्थिक पाठिंबा दिला आहे. त्यांनी नाबलीक विधवा आणि परीतक्त्या महिलांकरिता पंढरपूर येथे महिलाश्रम काढला आहे तर त्यांची सुविध्य पत्नी कै. डॉ काशीबाई नवरंगे ह्या मुंबईतील सेवा सदन ह्या काँग्रेस च्या महिला चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या आणि त्यांचे नावाने गावदेवी, ग्रांट रोड, मुंबई येथे 5 मजली महिला वसतिगृह आहे.
कै विष्णू नारायण मांदुसकर ह्यांनी 1914 साली इंग्रजीत अनुवादित केलेले ब्रह्म निरूपण संस्कार हे ह्या विषयातील रेफरन्स पुस्तक म्हणून वशिंग्टन च्या लायब्ररीत ठेवले आहे.
एके काळी उलट बाजूला ड्राइव्ह केले म्हणून ट्राफिक हवालदाराकरवी आपल्या पत्नीला दंड करणाऱ्या मुंबई म्युन्सीपल कमिशनर आय सी एस पिंपुटकर यांचा दरारा तर सर्व महाराष्ट्राला परिचित आहे.
महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी मराठी डिक्शनरी कै. कृष्णाजी भास्कर वीरकर, तर पहिली संस्कृत मराठी इंग्रजी डिक्शनरी कै. बळवन्त यशवंत जोशी ( आर एम भट हायस्कुल परळ चे मुख्याध्यापक) यांनी काढली हे दोन्ही देवरूखेच.
अगदी एवढेच काय स्वर्गीय लता दीदी आणि त्यांचे पिताश्री यांचें घरी माझे चुलत बंधू ( कै. भार्गव एकनाथ भोळे) आणि त्यांचा चार पिढ्यांचा परिवार पौरोहित्य करत आला आहे. आता त्यांचे नातू हे काम मंगेशकर कुटुंबीयांकडे करतात. त्यांचे काका ( कै शंकर प्रभाकर भोळे ) दिनानाथांकडे पौरोहित्य करत असत.
देवरूख्यांमध्ये फार थोडेच हाताच्या बोटावर मोजण्याइतके कमी शिकलेले ब्राह्मण अंत्यसंस्कार ची कामे करत असत पण बाकी अनेक उच्चशिक्षित ब्राह्मण नैमित्तिक पौरोहित्याची कामे अजूनही करतात.
त्यामुळे देवरूखे कमी दर्जाची कामे करत हा vested interest असलेल्या मंडळींचा अपप्रचार किंवा चुकीची माहीती सुधारण्याच्या ह्या हेतूने ही माहिती दिली आहे.
असो या विषयात जास्त माहिती घ्यायची झाल्यास
http://devarukhe.blogspot.com/2018/
ह्या लिंकवर जरूर मिळेल.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment