देवरुखे समाजाच्या जडणघडणीमध्ये देवरुखे ज्ञाती संस्थांचा किती अमूल्य वाटा आहे याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीला आलेले एक पत्र देणगीदाराच्या परवानगीने आवर्जून प्रसिद्ध करत आहे.
३१.०५.२०२१
प्रति; अध्यक्ष
देवरुखे ब्राम्हण
अनाथ कौटुंबिक निधी, मुंबई
स.न. वि.
वि.
मी पाच वर्षाचा
असताना माझे वडील १९४७ साली निर्वतले. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार, आईवर डोंगरच
कोसळला. कोणतेही आर्थिक साधन नाही त्यात आईच्या पदरी आम्ही दोन मुले होतो. अशा परिस्थितीत
आई आम्हाला घेऊन आमच्या आजोळी म्हणजे खत्तलवाड येथे श्री डांगे यांचेकडे आली.
कोणताही आर्थिक
आधार नाही, स्वतःची शैक्षणिक पात्रता नाही. होता फक्त आजोळचा भक्कम मानसिक आधार!. आईने अपार कष्ट करून,
आम्हाला शिकवून येथपर्यंत आणून सोडले. त्या वेळी कै. मोरूभाऊ ढापरे यांनी आईची दयनीय
अवस्था बघून संस्थेकडे अर्ज करण्यास सांगितले.
मला साल आठवत
नाही पण साधारण १९५४ - ५६ चे दरम्यान आईला वार्षिक रुपये २०/- अशी लागोपाठ २ वर्ष मदत
मिळाली. त्या चाळीस रुपये मदतीचे मोल अनन्य आहे. मी आता ८० व्या वर्षात पदार्पण करत
आहे आणि त्यानिमित्त संस्थेला रु ५०,००० ची देणगी देत आहे तिचा स्वीकार व्हावा.
आपला नम्र,
श्री सुहास
विठ्ठल मुळे, कीर्ती सोसायटी ठाणे (पूर्व), 400 603.
No comments:
Post a Comment